Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Ladki Bahin yojana ne update पती किंवा वडील नसतील तर Ladki Bahin Yojana KYC कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शन ! पती नसताना Ladki Bahin KYC करता येते का? इथे पहा अपडेट !

Ladki Bahin yojana ne update पती किंवा वडील नसतील तर Ladki Bahin Yojana KYC कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शन ! पती नसताना Ladki Bahin KYC करता येते का? इथे पहा अपडेट !



राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाव्दारे (Direct Benefit Transfer) आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे.

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्याकरिता e-KYC प्रक्रिया करण्यास दि. १८.११.२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, राज्यातील काही जिल्हयात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडीलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेंतर्गत अनेक



लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने "मुख्यमंत्री-माझी लाडकी वहीण" या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्याकरिता पर्यंत -KYC प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची वाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्याकरिता दि. ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत e-KYC कशी करावे

या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-KYC करावे व तद्नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दि.३१.१२.२०२५ पर्यंत जमा करण्यात यावी.


३. अंगणवाडी सेविकांनी त्यांचेकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करुन त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची e-KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस वाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे दाखल करावी. तद्नंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी.


४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५१११८१६४९३३८०३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

टीप-संपूर्ण माहिती GR मधून घेऊन सांगण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code