Rte Admission 2026 Document List ! Rte ऑनलाईन अर्ज भरतेवेळी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार
१३. बालकांच्या पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
1) बालकांच्या पालकांचे आई किंवा वडीलांचे आधारकार्ड अनिवार्य (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड अनिवार्य
2) बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)
3) भाडे तत्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य)
4) सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही)
5) आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नचा दाखला रूपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राहय समजण्यात येईल.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) निवासी पुरावा -२५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात ज्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / वीज देयक / टेलिफोन देयक /प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.
2) २५ टक्के प्रवेशप्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राहय धरण्यात येईल. सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्याठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकांचा प्रवेश मिळाला असल्यास तो रह करण्यात येईल.
3) जन्म तारखेचा पुरावा रुग्णालयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला. ग्रामपंचायत /मनपा/नपा यांचा दाखला /
4)सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे/बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तहसिलदार/उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडीलांचा/बालकांचा) जातीचे प्रमाणपत्र. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राहय धरण्यात येणार नाही.
5) आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला - सन २०२६-२७ या वर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विदयार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष सन २०२३-२४ किंवा सन २०२४-२५ या वर्षाचा ०१ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न् असलेला तहसिलदारांचा दाखला.
6) दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशल्य चिकीत्सक /वैदयकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
7) पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक (सिंगल पॅरेंट) (विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकांचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात येईल.
8) आरटीई २५ टक्के प्रवेश अर्ज भरतेवेळी बालकांच्या पालकांचे (आई किंवा वडील) यांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. बालकांचे आधारकार्ड नसल्यास आधारकार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकांच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पुर्तता न झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रह करण्यात येईल.
9) अनाथबालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. क) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र-उदा वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
10) एच.आय.व्ही बाधित/प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक / वैदयकिय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
11) घटस्फोटीत महिला पालक असल्यास १. न्यायालयाचा निर्णय २. घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा. ३. बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
12) न्यायप्रवष्ठि असलेल्या घटस्फोट प्रकरणतील महिला १. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा २. घटस्फोट प्रकरण न्यायप्रवष्ठि असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा. ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकांच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदापत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
13) विधवा महिला- १. पतीचे मृत्युप्रमाणपत्र २. विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा राहिवासी पुरावा ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकांतील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

0 Comments