MHADA Tathawade Pune Lottery 2026: एकूण 792 घरे | Full Details, Price, Dates, Apply Process | 792 घरांची मोठी संधी | अर्ज कसा करावा
नोंदणी प्रक्रिया नोंदणी सुरू करण्यापूर्वी खालील आवश्यक कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करून घ्यावी
नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी
मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असावा
आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केलेला असावा. जेणेकरून अर्जदाराला आधार पडताळणीकरिताचा OTP मोबाईल क्रमांकावर प्राप्त करता येईल
ई-मेल आयडी
ईमेल आयडीची सत्यता पडताळणीकरिताचा OTP आपल्या ईमेल आयडीवर पाठवला जाईल. तसेच, लॉटरी संदर्भातील इतर संदेश या ईमेल आयडीवरती पाठवले जातील
आधार कार्ड
आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या आधारकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल.
पॅन कार्ड
आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या पॅनकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. आपले पॅन कार्ड डिजीलॉकर प्रणालीशी जोडले (link) असल्याची खात्री करून घ्यावी.
विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार कार्ड
आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या आधारकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल.
विवाहित असल्यास पती-पत्नीचे पॅन कार्ड
आपल्या आधारक्रमांकाची यशस्वी पडताळणीअंती, आपल्या पॅनकार्डची प्रत स्वयंचलितपणे डिजीलॉकर प्रणालीतून डाउनलोड होईल. आपले पॅन कार्ड डिजीलॉकर प्रणालीशी जोडले (link) असल्याची खात्री करून घ्यावी.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्माणपत्र
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे १ जानेवारी २०१८ नंतर जारी झालेले ग्राह्य धरण्यात येईल व ते महाऑनलाइन प्रणालीद्वारे जारी केलेले व बारकोड असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.डोमिसाईल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही. नवीन अधिवासासाठी अर्ज करण्यासाठी, लिंक
अर्जदाराचा स्वतःचा उत्पन्न पुरावा
1 जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास
*पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. यानंतर आपला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड टाकून “verify” बटन क्लिक करावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल.
*उत्पन्न वर्षाकरिता सोडतीची जाहिरात व माहितीपुस्तिका काळजीपूर्वक पहावी.
अर्जदाराची पती पत्नी नोकरी व्यवसाय करीत असल्यास त्यांचा उत्पन्न पुरावा
1 जर आपल्याकडे आयकर परतावा असल्यास
*पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. यानंतर आपला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड टाकून “verify” बटन क्लिक करावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल.
*उत्पन्न वर्षाकरिता सोडतीची जाहिरात व माहितीपुस्तिका काळजीपूर्वक पहावी.
तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास अर्जदार किंवा त्यांची पत्नी पती-पत्नी यापैकी कोणाही एकाचे
*तहसीलदार कार्यालयाने दिलेले कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र (ज्यात अर्जदार स्वतःचे व त्याच्या पती/पत्नीचे उत्पन्न समाविष्ट असेल) ग्राह्य धरले जाईल. पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे. त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे. जर आपण विवाहित असाल आणि आपले पती/पत्नी नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे. संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेल्या वर्षाकरिताचे आपले उत्पन्न पडताळेल.
*उत्पन्न वर्षाकरिता सोडतीची जाहिरात व माहितीपुस्तिका काळजीपूर्वक पहावी.
जात प्रवर्गातील आरक्षण
1 अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती या प्रवर्गाकरिताच अर्ज करू शकता
2 उपरोक्त जात प्रवर्गामध्ये नोंदणीकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
3 जर आपणाकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर नाही हा पर्याय निवडून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. आपण सोडतीत विजेते झाल्यानंतर आपणाला जात वैधता प्रमाणपत्र जमा करावे लागेल
विशेष आरक्षित प्रवर्ग
1 जर आपणाला विशेष आरक्षित प्रवर्गातून (कलाकार,पत्रकार, राज्य शासन कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्या वरील अवलंबीत व्यक्ती, म्हाडा कर्मचारी, दिव्यांग, आमदार व खासदार) अर्ज करवायचा असल्यास योग्य त्या प्रवर्गासमोरील ‘हो’ पर्याय निवडावा अर्ज करवायचा असल्यास लागणाऱ्या बाबी
2 म्हाडा कर्मचारी व दिव्यांग प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गाकरिता अर्जदाराला “certificate Generation” पर्याय वापरुन नवीन प्रमाणपत्र तयार करावे लागेल. व ही तयार केलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत करून अपलोड करावे लागेल.
3 म्हाडा कर्मचारी यांना आपले कर्मचारी क्रमांक असलेले ओळखपत्र अपलोड करावे लागेल.
4 दिव्यांग प्रवर्गाकरिता अर्जदाराला UDID / स्वावलंबन कार्ड अपलोड करावे.
5 कलाकार प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी कलाकार प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
6 स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
7 जर तुम्ही खासदार / आमदार या प्रवर्गातील असाल आणि आपल्याकडे त्याचे प्रमाणपत्र नसेल तर खासदार/आमदार प्रवर्गाची पडताळणी ही अर्जदाराने घराचा ताबा मिळण्यापूर्वी खासदार/आमदार या प्रवर्गाचे प्रमाणपत्र जमा करावे या अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे
विशेष सूचना : - विशेष आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत नसेल व जरी असे प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीने स्विकारले तरी अशा अर्जदारांचे अर्ज कोणत्याही वेळी रद्द होण्यास पात्र असतील.
वैवाहिक स्थिती विधवा असणाऱ्या अर्जदारांकरिता
कृपया अर्जदाराने आपल्या पती/पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करावे
0 Comments